दोन लाख ९६ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
-
- २५ हजार विद्यार्थ्यांचे शुल्क दिवाळी सुटीत केले परत
- पदव्युत्तर अभ्यासक्रमाची २१ नोव्हेंबरपासून परीक्षा
-
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसलेल्या २ लाख ९६ हजार ११४ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे. तर शुल्क भरलेल्या ५१ महाविद्यालयांतील २५ हजार ०७४ विद्यार्थ्यांचे शुल्क दिवाळी सुटीतही कार्यालय सुरू ठेऊन परत केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.बी.एन.डोळे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे वेळापत्रक, मूल्याकंन केंद्र स्थापन करण्यात आले असून पारदर्शक रीतीने परीक्षा घेण्यासाठी परीक्षा विभागाने प्रयत्न केले. तसेच प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ही प्रयत्नशील राहिले. २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम यासह एकूण १४ पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर अशा दोन टप्प्यांत या परीक्षा घेण्यात येत आहेत. पदवी परीक्षांचे २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पेपर होणार आहेत. तर सर्व व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
दिवाळी सुटीच्या काळात ६ व ७ नोव्हेंबर या दोन दिवशी परीक्षा विभागातील समन्वय विभाग सुरू ठेवण्यात आला. एकूण ५१ महाविद्यालयातील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी १ कोटी ८८ लाख ३३ हजार ७६१ रुपये एवढे परीक्षा शुल्क जमा केले होते. यातील ३४ महाविद्यालयांनी १ कोटी ३६ लाख ४४ हजार ७५६ रुपयांचे धनादेश दिवाळी सुटीत परत नेले. संबंधित महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना तत्काळ शुल्क परत करावेत, असे डॉ डोळे यांनी कळविले आहे. परीक्षा विभागातील समन्वयक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु कऱ्हाळे, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे, हरिदास खुडे आदी कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.