fake doctor fake doctor
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! अद्याप कारवाई नाही

शासकीय आरोग्याची सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने, त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जातो आहे

सकाळ वृत्तसेवा

-सोमनाथ तवार

कडेठाण (औरंगाबाद): आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैठण तालुक्यातील बालानगर गावात फक्त एकाच बोगस डॉक्टरवर थातुरमातुर कारवाई केली. इतर बोगस बंगाली डॉक्टरवर अद्याप पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावांत आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने सर्रासपणे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे. शासकीय आरोग्याची सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने, त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जातो आहे. गेल्या काही वर्षांपासून बोगस बंगाली डॉक्‍टरांनी पैठण तालुक्यातील कडेठाण, आतंरवाली खांडी, दाभरुळ, ब्राम्हणगाव, खादगाव, राजनगाव दांडगा, पारुंडी, दरेगाव व तालुक्यातील ईतर ग्रामीण भागात आपला चांगलाच जम बसवला आहे. यामुळे गरीब-अशिक्षित सर्व सामान्य अशिक्षित लोकांच्या जिवावरच बेतत आहे.

तर दुसरीकडे यासंदर्भात आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले आहे. कुठलीही नोंदणी अथवा परवाना नसताना बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. साध्या आजाराच्या रुग्णांना आरामही पडतो. मात्र अतिगंभीर आजाराचा रुग्ण असल्यास हे डॉक्टर त्याला इतर रुग्णालयांत पाठवून देतात. हा व्यवसाय करताना अंगलट येण्यासारखे काही प्रकरण घडल्यास ते बाहेरच्या बाहेर मिटवले जावे यासाठी बोगस डॉक्टरांकडून सर्रास स्थानिक पुढारी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरले जाते.

मागील कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. कार्यवाही होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे दवाखाने बिनबोभाटपणे अजूनही खेड्यापाड्यात सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून यावर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली जात नाही हे विशेष. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. कोरोनाची लक्षणे अनेकांना असतानाही भीतीपोटी नागरिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल न होता बोगस बंगाली डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत.

काही बोगस डॉक्टर घरोघरी जाऊन नागरिकांवर उपचार करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे आजार वाढल्यानतंर रूग्णांना शहरातील मोठ्या दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो यामुळे सदरील रुग्णांच्या आरोग्याची हानी व आर्थिक नुकसान होते. अशा वेळी सदरील रुग्णाच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास संबंधित बोगस डॉक्टर आपले ठिकाण बदलून पुन्हा नवीन दुसऱ्या नवीन गावात नव्याने व्यवसाय सुरु करतात असे समोर आले आहे. तरी अशा बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT