fake rate of kesar saffron fraud with consumer sambhaji nagar market sakal
छत्रपती संभाजीनगर

Saffron : मुदतवाढ करून बनावट दराने केशरची विक्री

ग्राहकांची फसवणूक ः संभाजीनगरमधील प्रतिष्ठित दुकानातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

- राहुल जोशी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काही दुकानदार मूळ किमतीपेक्षा दुपटीने दर वाढवून आणि मुदतीची तारीख वाढवून केशरची विक्री करत आहेत. यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी येथील दुकानात हा प्रकार घडला. पण दुकानदाराने कंपनीकडे बोट दाखवून हात वर केले आहेत.

गुलमंडीतील दुकानात पुण्यातील एका कंपनीच्या केशरची विक्री होते. एका ग्रॅमच्या पाकिटावर ३५० रुपये किंमत आहे. पण दुकानचालक ते २०० रुपयांना विकतो. याबाबत महिला ग्राहकाला संशय आल्याने तिने किमतीचे स्टिकर काढले.

त्याखाली कंपनीच्या मूळ पाकिटावर एक ग्रॅम केशरची किंमत १८० रुपये असून त्याची वापरण्याची मुदत डिसेंबर २०२४ आहे. पण नंतर त्यावर ३५० रुपये किमतचे स्टिकर लावत मुदतीची तारीख जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कायद्याने गुन्हा

केशरची किरकोळ बाजारात गुणवत्तेनुसार प्रतिग्रॅम ३०० ते १,५०० रुपयांपर्यंत विक्री होते. आरोग्यवर्धक केशरला ग्राहकांकडून मागणी असते. केशरसारख्या पदार्थांची विक्री करण्यासाठी विशिष्ट मुदतीचा कालावधी असतो. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वावर मुदतीची तारीख पाकिटावर नमूद असते. तारीख उलटून गेल्यास त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही मुदत वाढवून केशर विकण्याचे प्रकार सुरू आहेत.

दुकानदाराचे कानावर हात

या प्रकाराबाबत दुकानमालक दीपक बादशहा यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी ‘यात दुकानाचा काही संबंध नाही. आम्हाला त्या स्टिकरसह कंपनीकडूनच माल विक्रीसाठी देण्यात येतो. हा प्रकार मला आताच समजला’, असे स्पष्टीकरण दिले.

कंपनी म्हणते, प्रिंटिंग मिस्टेक

पुणे येथील कंपनीचे मालक जितू यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, पाकिटावर छपाईतील चुकीमुळे अर्ध्या ग्रॅमचे दर आहेत. पण केशरचे वजन १ ग्रॅम असल्याने सुधारित स्टिकर लावले. ही तांत्रिक चूक असून ग्राहकांची तक्रार असेल तर केशर परत घेण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT