छत्रपती संभाजीनगर

साडेतीन लाखांचा बनावट साबण जप्त

CD
नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट साबणांची विक्री ----- छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : बाजारातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडशी मिळतेजुळते लेबल्स लावून बनावट कपड्यांच्या साबणाची साठवणूक व विक्री करणाऱ्या रॅकेटचा जिन्सी पोलिसांनी पर्दाफाश केला. कारवाईत तीन लाख ५३ हजार १२० रुपयांचे अडिच हजार साबणांचे बनावट खोके जप्त करण्यात आले. या प्रकरणी पैठण तालुक्यातील वडगाव येथील पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी व्यावसायिक रणजित पंडितराव थोरात (वय ५८, रा. बन्सीलालनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दिली. त्यांच्या कंपनीच्या सोना, गोपी व गीता साबणांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कशी हुबेहूब मिळणारे बनावट लेबल तयार करून आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी फसवणूक सुरू केली होती. संशयित आरोपी अशोक भीमराज काळे व त्याचा मुलगा सुनील अशोक काळे (दोघे रा. वडगाव, ता. पैठण) यांनी संगनमत करून स्वरूप इंडस्ट्रीज, वडगाव या नावाने बनावट गायत्री १० वड्या व इतर आकारांचे लेबल्स चिटकवून साबणांची साठवणूक केली होती. रोशनगेट परिसरातील लतीफ किराणा दुकानाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वेगवेगळ्या आकाराचे हजारो साबणाचे बॉक्स, छपाईचे लाकडी व पितळी स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात २ हजार ५०७ वेगवेगळ्या ९ प्रकारच्या साबणांचे बॉक्सचा समावेश असून याप्रकरणी पिता पुत्रांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT