sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : अजिंठा चित्रांचा कॅनव्हास झाला ‘रिता’ ; प्रसिद्ध अजिंठा चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

अमूर्तशैली, भित्तिचित्र ते अजिंठा लेणीचे चित्रकार असा चित्रमय प्रवास थांबला. येथील प्रसिद्ध अजिंठा चित्रकार विजय विष्णुपंत कुलकर्णी (वय ७३, रा. पैठण गेट) यांचे सोमवारी मध्यरात्री पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. अजिंठा चित्रशैलीकार अनेक आहेत. पण त्या चित्रांना विजय कुलकर्णी यांनी दिलेला आदर आणि समर्पण आज दिसत नाही, अशी खंत कलाविश्वातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अमूर्तशैली, भित्तिचित्र ते अजिंठा लेणीचे चित्रकार असा चित्रमय प्रवास थांबला. येथील प्रसिद्ध अजिंठा चित्रकार विजय विष्णुपंत कुलकर्णी (वय ७३, रा. पैठण गेट) यांचे सोमवारी मध्यरात्री पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. अजिंठा चित्रशैलीकार अनेक आहेत. पण त्या चित्रांना विजय कुलकर्णी यांनी दिलेला आदर आणि समर्पण आज दिसत नाही, अशी खंत कलाविश्वातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मूळचे वेरूळचे रहिवासी असलेले कुलकर्णी यांनी सत्तरच्या दशकात मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. भित्तिचित्रणमध्ये (म्यूरल पेंटिंग) त्यांचा विशेष हातखंडा होता. म्यूरल पेंटिंग, अमूर्त चित्रशैली आणि अजिंठा चित्रासाठी ते प्रख्यात होते. सईद हैदर रझा, एस. व्ही. वासुदेव, चार्ल्स कोरिया, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सारा अब्राहम आदी दिग्गजांनीही कुलकर्णी यांचे कौतुक केले होते.

मुंबईहून संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर त्यांनी १९८२ मध्ये वेरूळ येथे ‘रॉक आर्ट गॅलरी’ सुरू केली व अजिंठा चित्रासाठी आयुष्य वाहून घेतले. विजय कुलकर्णी यांच्यावर मंगळवारी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, विक्रांत आणि विराज ही दोन मुले, सुना, नात आणि वहिनी असा परिवार आहे.

प्रसिद्धीपासून दूर

जे. जे. स्कूल, ललित कला अकादमी, एअर इंडिया, मंत्रालय, विधान भवन, राष्ट्रपती भवन, परराष्ट्र मंत्रालयासह विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये विजय कुलकर्णी यांची चित्रे लक्ष वेधून घेतात. भारताबाहेरही अनेक देशांत त्यांची चित्रे गेली आहेत. आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

SCROLL FOR NEXT