लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) - लासुर (ता.गंगापूर) येथील नागपूर-मुंबई महामार्गावर सावंगी चौकात शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आंदोलन केले.  
छत्रपती संभाजीनगर

शेतकरी आक्रमक, नागपूर-मुंबई महामार्गावर टोमॅटो दिली फेकून

अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) (Gangapur) येथील सावंगी चौकात गुरुवारी (ता.२६) सकाळी दहाच्या सुमारास शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आंदोलन केले. टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचा यावेळी पाहायला मिळाला. नागपूर (Nagpur) - मुंबई (Mumbai) महामार्गावर सावंगी चौकात येथे तब्बल एक तासभर चाललेल्या या आंदोलनादरम्यान वाहतूक बंद झाली होती. टोमॅटोला (Tomato Producing Farmer) प्रति कॅरेट पाचशे रुपये हमीभाव जाहीर करावा, अतिवृष्टी नुकसान झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मंजूर करावे, टोमॅटोची निर्यातबंदी उठवावी, लासूर स्टेशन येथे टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू करावा, टोमॅटो खरीददार (Agriculture) व्यापाऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, आदी मागण्यांचे निवेदन शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारात स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे.

टोमॅटोच्या वीस किलोच्या क्रेट्सला पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत म्हणजे तीन-चार रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. या कमी दरामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहतूक, मार्केटमधील चढ-उतार, शेतातून तोडणीचा खर्चही निघत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला. एकरी ऐंशी हजारहून अधिक खर्च टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना येतो. टोमॅटोला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी योग्य दर न मिळाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत. माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात धामोरीचे उपसरपंच रविंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे, मनसेचे अण्णासाहेब जाधव, अमोल जाधव, संजय पांडव, नजीर पटेल, अभिजीत माळोदे, संजय चव्हाण, विलास इंगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT