Chatrapati Sambhaji Nagar Farmer News 
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhaji Nagar: तळपत्या उन्हात शेतकऱ्यांचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा; कारण, अनुदान...

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रूपयांची पेरणीपुर्व मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयापर्यंत पदयात्रा काढली. रणरणत्या ऊन्हात शेतकऱ्यांनी क्रांतीचौकापासून पदयात्रा काढून विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना निवेदन दिले.

रणरणते ऊन असतानाही त्याची पर्वा न करता युवा शेतकरी संघर्ष समितीचे गणेश उगले पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २२ ) गणेश उगले पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असून बहुतांश शेतकरी आत्महत्यांच्या मागे अर्थिक कारणे असल्याचे बळीराज सर्वेक्षणातुन पुढे येत आहे.

यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर शेतकऱ्यांना खरीप आण रब्बी हंगामाच्या पेरणीपुर्वी दहा हजार रूपयांचे अनुदान देण्याची शिफारस शासनाकडे केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेची सुरूवात झाली.

ऊन चांगलेच तापलेले असतानदेखील उन्हाची पर्वा न करता आंदोलक शेतकरी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत चालत गेले. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातुन शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे

त्यात म्हटले आहे की, मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी, गारपीट, सततच्या पावसामुळे अडचणीत आला आहे. (Latest Marathi News)

विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा सर्वे करून शेतकऱ्यांना पेरणीच्यावेळी एकरी दहा हजार रूपये अनुदान देण्याची शासनाकडे शिफारस केली आहे. त्या शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्रेकर यांचा केला सत्कार

शेतकरी संकटात असताना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी चांगला प्रस्ताव दिला आहे. शासनाने त्यांच्या या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी असा ५१ ग्रामपंचायतीनी घेतलेला ठराव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला. तसेच श्री. केंद्रेकर यांना देवदुताचा मान देत शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT