छत्रपती संभाजीनगर

बीडमधील चार लाख शेतकऱ्यांचे ''नमो शेतकरी''चे दोन हप्ते रखडले

CD
बळिराजाची कोंडी; नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते रखडले केंद्राचे ‘पीएम किसान’ खात्यात, पण राज्याचा निधी अद्याप गायब सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १७ : यंदा पावसाने ओढ दिल्याने बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळिराजा आधीच भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात मोठा आधार ठरू शकणाऱ्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील दोन हप्ते अद्याप रखडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असले, तरी राज्य सरकारकडून मिळणारा हक्काचा निधी अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करून वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. मात्र, बीड जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे मागील दोन हप्ते अजूनही जमा झालेले नाहीत. यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, हा गंभीर प्रश्न बळिराजासमोर उभा आहे. ---- राज्य स्तरावरून थेट निधी वितरणाची प्रक्रिया केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर, त्याच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा निधी थेट राज्य शासनाच्या पातळीवरून पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. यामध्ये स्थानिक पातळीवरून निधी वितरणात कोणताही हस्तक्षेप नसतो. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, राज्य स्तरावरून तांत्रिक व निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हे प्रलंबित हप्ते थेट जमा होतील. ----- बळिराजाची हतबलता आणि तातडीच्या मदतीची मागणी यंदा पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. हातात पैसा नसल्याने घरखर्च कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न आहे. केंद्राचे पीएम किसानचे पैसे आले, पण राज्य सरकारच्या नमो योजनेचे दोन हप्ते अद्याप आलेले नाहीत. हे सर्व पैसे मिळून कसतंरी महिनाभराचा घरखर्च चालतो. त्यामुळे ऐन दुष्काळी संकटात सरकारने हा निधी तातडीने खात्यावर जमा करावा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अशोक पवार या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, तिघे गंभीर जखमी

सिडकोची घरं धोकादायक, पाच वर्षांतच इमारतींची दुरवस्था; कुठे स्लॅब कोसळतोय, तर कुठे भिंतींना तडे

SCROLL FOR NEXT