छत्रपती संभाजीनगर

पीक विम्याबाबत अपील फेटाळले; दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा

CD
पीक विम्याबाबत अपील फेटाळले; दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १२ : खरीप २०२३ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दाखल तक्रारींप्रकरणी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी विमा कंपनीच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना भरपाई नाकारू नये, अशी मागणी त्यांनी केली. राज्याचे कृषी सचिव तथा समितीचे अध्यक्ष परिमल सिंह यांनी याबाबत आदेश दिले. खरीप २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. अपेक्षित भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर अशोक चव्हाण यांनी २२ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यात सुमारे दीड लाख तक्रारी दाखल झाल्या. जिल्हास्तरीय समितीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिल्यानंतर विमा कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. मात्र, हे अपील फेटाळण्यात आल्याने तक्रारदार शेतकऱ्यांना गावनिहाय निश्चित किमान नुकसान टक्केवारीपेक्षा अधिक भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT