Farmer suicide due to barrenness and indebtedness ended his life by jumping in front of train Sakal
छत्रपती संभाजीनगर

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; धावत्या रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवले

मागील काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती

संतोष शेळके

करमाड : सलग नशिबी आलेली नापिकी व यातून वाढत जाणाऱ्या कर्जाला कंटाळून मागील काही दिवसांपासून मानसिक स्थिती ढासळलेल्या 40 वर्षीय शेतकऱ्याने शेवटी धावत्या रेल्वेसमोर उडी मारुन आपले जीवन संपवले.

सटाणा (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील फकीरवाडी जिल्हा परिषद शाळेलगतच्या रेल्वे रुळावर शुक्रवारी (ता. तीन) मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. भाऊसाहेब दामू ठोंबरे (39, रा. गाढेजळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) असे या घटनेत मृत पावलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. श्री. ठोंबरे यांची गाढेजळगाव शिवारात दोन एकर कोरडवाहू शेती आहे.

मागील काही वर्षापासून पावसाच्या लहरीपणामुळे एकीकडे शेती तोट्यात जात होती तर घेतलेले कर्ज मात्र वाढत चालले होते. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया व गावस्तरावरील सेवा संस्थेचे कर्ज असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. यातूनच मागील काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नव्हते. सगळीकडे शोधाशोध सुरू असताना शनिवारी सकाळी काही जणांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गाढेजळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री. ठोंबरे यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ढाकणे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT