aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांनी पाडला कांदा लिलाव बंद

पोलिसांच्या मध्यस्तीने दुपारनंतर लिलावाला सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर : येथील बाजार समितीच्या लिलावामध्ये कांदा कमी दराने खरेदी केला जात असल्याचे सांगत संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) कांदा लिलाव बंद पाडून जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मध्यस्तीने दुपारनंतर लिलावाला सुरवात झाली. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत येथील भाव खूप कमी मिळत आहे. (Aurangabad News)

शिवाय दोन दिवसांच्या दरात प्रति क्विंटल मागे ५०० रुपये कमी मिळत असल्याचे कारण शेतकरी आक्रमक झाले होते. कमीत कमी १ हजार ६०० रुपये क्विंटलचा दर कांद्याला मिळावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांचा निषेध केला. संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर-वैजापूर मार्ग काही काळ रोखून धरल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या वतीने बाजार समिती अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्ती केल्याने लिलाव पुन्हा सुरळीतपणे सुरू झाला. यावेळी शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT