farmers loan waiver scheme fails bank recovery continue pachod marathi news Sakal
छत्रपती संभाजीनगर

Farmer News : कर्जमाफीच्या दोन्‍ही योजना ठरल्‍या कुचकामी; बॅंकेकडून कर्ज वसुलीचा तगादा कायम

शेतकरी पाच वर्षानंतरही प्रतिक्षेत

हबीबखान पठाण

पाचोड : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या दोनदा योजना राबवूनही अनेक शेतकरी पाच वर्षानंतरही कर्जमाफीचीच्या प्रतीक्षेत असून एकंदरीत ते बँकेच्या दफ्तरी थकबाकीत येत असल्याने नवीन कर्ज मिळविण्यासाठी अपात्र ठरत असल्याचे पाहावयास मिळते.

एवढेच नव्हे तर थकीत कर्ज भरून घेण्यासाठी बँकेकडून ससेमिरा सुरु असल्याचे चित्र पाचोड परिसरात दिसून येत आहे. युती सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी एकोणीस अटी घालत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान नावाने कर्जमाफी योजना अमलात आणून दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचीचा निर्णय जाहीर केला होता.

यातून जे कर्जदार वंचित राहिले. त्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांच्या अर्जानंतर सरसकट एक लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचे जाहीर केले.

कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. मात्र, भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जात तांत्रिक चुका झाल्याने पाचोड (ता.पैठण) येथील बँकाचे अनेक शेतकरी दोन कर्जमाफीच्या योजना राबवूनही लाभापासून वंचित आहेत. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारने अद्यापही एक दमडीही जमा केली नसल्याने कर्जमाफीच्या लाभार्थींच्या खात्यात पाच वर्षानंतरही खडखडाटच आहे.

१६८४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले.

महाराष्ट्र बँकेच्या पाचोड शाखेकडून केवळ चाळीस हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जमाफीसाठी दोन्ही योजनेत अर्ज भरून पाच वर्ष होत आले. परंतु अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आम्हाला कर्जमाफी झाल्याचे बँकेकडून सुरवातीला सांगण्यात आले, मात्र, अर्जात तांत्रिक चूक झाल्याचे सांगून कर्जमाफी टाळली गेली.

- याकुबभाई पठाण,कर्जदार, शेतकरी

संबंधित लाभार्थ्यास लाभ का मिळाला नाही, हे काही सांगता येणार नाही. त्यांना लाभ मिळावा म्हणून बँकेच्या वतीने शासनाकडे विनंतीवजा मेल पाठविण्यात आला आहे. त्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने नवीन कर्ज देता येत नाही. वरिष्ठ पातळी वरून कर्जमाफीचे आदेश प्राप्त होताच लाभ व नवीन कर्ज देण्यात येईल.

- रंगनाथ व्यवहारे,शाखाधिकारी,महाराष्ट्र बँक, पाचोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT