छत्रपती संभाजीनगर

तलावातील पाणी उपशावरून शेतकरी- अधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक

CD
ABD26J82077 हिंगोली : पेडगाव मळई तलावातील पाणी उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या महसूल व पाटबंधारे विभागाच्या पथकास घेराव घालून जाब विचारताना संतप्त शेतकरी. ----- शेतकऱ्यांच्या रोष पाहून पथक माघारी ----- पेडगाव मळई तलावातील पाणी उपशावरून शाब्दिक चकमक ------ हिंगोली, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यातील पेडगाव मळई येथील तलावातील शेतीसाठीचा पाणी उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय पथकाला संतप्त शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी (ता. २३) घडलेल्या या प्रकारात शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि आक्रमक पवित्रा पाहून पाणी उपसा न थांबविताच पथकाला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली असून, बळिराजा संकटात सापडला आहे. सोयाबीनच्या काढणीतून लागवड खर्चही वसूल झालेला नाही. त्यातच शेतात उभी असलेली हळद, तूर व कापूस ही पिके सध्या तीव्र पाण्याच्या टंचाईमुळे करपून जात आहेत. पाण्याची भीषण परिस्थिती पाहता रब्बी पिकांचा विचार करणेही अशक्य बनले आहे. त्यामुळे हाताशी आलेली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तलावांमधील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवत शेतीच्या उपशावर निर्बंध लादण्यात येत आहेत. याच अनुषंगाने हे पथक पेडगाव मळई येथे कारवाईसाठी पोचले होते. ---- लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती कारवाईसाठी पथक तलावावर पोचताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. ‘आतापर्यंत हळद पिकासाठी एकरी एक लाख रुपयांहून अधिक लागवड खर्च केला आहे. आता ऐन भरात आलेले पीक पाण्याअभावी डोळ्यांसमोर वाळून गेले, तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही,’ अशी कैफियत शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडली, तर दुसरीकडे, ‘वरिष्ठ पातळीवरून पाणी उपसा बंद करण्याचे स्पष्ट आदेश आहेत,’ अशी भूमिका पथकातील अधिकाऱ्यांनी घेतली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता कारवाई करणे अशक्य झाल्याने शेवटी पथकाने तेथून काढता पाय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT