छत्रपती संभाजीनगर

संकटातील रब्बी हंगामाला दमदार पावसाची आशा ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या

CD
ढग दाटले, रब्बीच्या आशा जागल्या! ---- दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा ------ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २८ ः यंदा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही; मात्र जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर ढगाळ हवामान कायम असल्याने रब्बी पेरण्यांची आशा सोडून दिलेल्या शेतकरीवर्गामध्ये पावसाची अपेक्षा निर्माण झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडलेल्या रब्बी हंगामासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्याअभावी या हंगामात ज्या शेतजमिनी पडीक ठेवण्यात आल्या आहेत, तिथे रब्बीच्या पेरण्या करण्यासाठी सध्या पावसाची नितांत गरज भासत आहे. जिल्ह्यात मोजक्या क्षेत्रावरील रब्बीची पेरणी वगळता बहुतांश ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. सिंचनाची पुरेशी सोय नसलेल्‍या आणि पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्चात न जाता आपले शेतीक्षेत्र तूर्तास पडीक ठेवणेच पसंत केले आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामावर सुरवातीपासून संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही ढगाळ हवामान प्रकटल्याने बळिराजाच्या नजरा पुन्हा एकदा आकाशाकडे लागल्या आहेत. आता हवामानात बदल होऊन दमदार पाऊस झाला, तर हे निराशाजनक चित्र बदलण्यास मोठी मदत होऊ शकते. या पावसामुळे भेगाळलेल्या जमिनीत ओलावा निर्माण होऊन रखडलेल्या रब्बी पेरण्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल आणि मोठा दिलासा मिळू शकेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यात थोडेफार पाणी उपलब्ध असलेले शेतकरी एकूण क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र पडीक ठेवून काही भारी जमिनीचे क्षेत्र स्प्रिंकलरद्वारे भिजवून रब्बी पेरण्या उरकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे केवळ पावसाच्या आणि जमिनीतील ओलीच्या पाण्यावरच रब्बी पिके घेतात. पाणीच उपलब्ध नसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पेरण्या पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. ----- ((चौकट)) मागीलवर्षी ९६ टक्के पेरण्या जिल्ह्यात रब्बी पिकांचे एकूण सरासरी क्षेत्र चार लाख १७ हजार ९०१ हेक्टर आहे. त्यापैकी मागीलवर्षी प्रत्यक्ष चार लाख एक हजार ६१७ हेक्टर क्षेत्रावर (म्हणजेच सुमारे ९६.१० टक्के क्षेत्र) रब्बीची पेरणी पूर्ण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ९१ हजार ५१६ हेक्टरवर (९१.८२ टक्के) पेरणी झाली होती, तर ज्वारीची एक लाख १२ हजार २०५ हेक्टरवर (९३.०४ टक्के) पेरणी नोंदवली गेली. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदाच्या पेरण्या ठप्प झालेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

SCROLL FOR NEXT