छत्रपती संभाजीनगर

विजयाचा गुलाल निघण्यापूर्वीच आमदार शेतकरीपुत्रांसाठी धावले पदवीधरांसाठी दरमहा ४ हजार मदतीची विभागीय आयुक्तांकडे मागणी

CD
विजयाचा गुलाल उधळण्यापूर्वीच शेतकरीपुत्रांसाठी धावले आमदार पदवीधरांसाठी दरमहा ४ हजार मदतीची विभागीय आयुक्तांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २९ : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते पहाटे विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच थेट विभागीय आयुक्त कार्यालय गाठून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरीपुत्रांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला. मराठवाड्यातील दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांतील एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये विशेष आर्थिक सहाय्य देण्याबाबतचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केले. मराठवाड्यात यंदा सोयाबीनसह खरीप पिकांचे झालेली मोठी हानी आणि रब्बी हंगामाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी काहीही आलेले नाही. अशा स्थितीत विविध शहरांत राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खोलीचे भाडे, भोजन, अभ्यासिका, पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च भागवताना पालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांतील पात्र पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, पुणे व इतर शहरांत राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी हातभार लावावा, शेतकरीपुत्रांचे भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून शासन स्तरावर तातडीने विशेष योजना सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: सरपंच मंगेश साबळे यांनी भीमाशंकर येथे होणाऱ्या वृक्षतोडीचा केला विरोध

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

SCROLL FOR NEXT