छत्रपती संभाजीनगर

ऊसदरासाठी आंदोलनाचा इशारा

CD
उसाला चार हजारांची पहिली उचल द्या, अन्यथा रास्ता रोको धाराशिव, ता. १४ (बातमीदार) : उसाला प्रतिटन चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पहिली उचल जाहीर करा, अन्यथा सोमवारपासून (ता. १६) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी (ता. धाराशिव) टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ऊसदराच्या प्रश्नावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निवेदने आणि विविध आंदोलने करण्यात आली. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊनही दरवाढीची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात बैठक बोलावली होती; मात्र एकही कारखानदार उपस्थित न राहिल्याने बैठक निष्फळ ठरली. दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही अद्याप बैठक झाली नसल्याने प्रशासन आणि कारखानदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी प्रतिटन चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पहिली उचल द्यावी आणि पंधरा दिवसांच्या आत ऊस बिल जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, खरीप हंगामाचा शंभर टक्के पीकविमा, २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील प्रलंबित विम्याचे वितरण करावे. जनावरांसाठी चारा छावण्यांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशाही मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT