Festive Mehndi Competition esakal
छत्रपती संभाजीनगर

Festive Mehndi Competition : तरुणी, महिलांसाठी ‘सकाळ’तर्फे २० जुलैला ‘फेस्टिव्ह मेंदी’ स्पर्धा

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘गरवारे कम्युनिटी सेंटर’ यांच्या वतीने १८ वर्षांवरील युवती व महिलांसाठी २० जुलैला ‘फेस्टिव्ह मेंदी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मेंदीला भारतीय परंपरेत सन्मानाचे स्थान. आधुनिक काळातही परंपरेला जोडणाऱ्या मेंदीचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपासून आढळतो. लवकरच श्रावण महिना येतोय. श्रावणाचा आनंद द्विगुणित करत मेंदी काढण्याच्या कलेची जोपासना म्हणून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘गरवारे कम्युनिटी सेंटर’ यांच्या वतीने १८ वर्षांवरील युवती व महिलांसाठी २० जुलैला ‘फेस्टिव्ह मेंदी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांना 'भारतीय सण' हा विषय घेऊनच मेंदी काढावी लागेल. प्रथम विजेत्या स्पर्धकास मानाची पैठणी दिली जाईल. तर ५० स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस दिली जातील. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र असेल. चला मग, वाट कसली बघताय. आपले कला जगाला दाखवण्याची हीच ती वेळ आहे.

तयारीला लागा आणि महिलांसाठी असलेल्या या सुंदर स्पर्धेत सहभागी होऊन पैठणी जरूर जिंका! नोंदणीसाठी इच्छुक स्पर्धकांनी सकाळ कार्यालयाशी ७४१००३०२४५ किंवा ७४१००३०२४६ या क्रमांकावर अथवा गरवारे कम्युनिटी सेंटरसोबत ९९२२४००४२८ या क्रमांकावर नोंदणी करावी. नोंदणीसाठी आपले संपूर्ण नाव पत्ता व संपर्क क्रमांक सांगणे बंधनकारक आहे.

सकाळ ‘फेस्टिव्ह मेंदी स्पर्धा’

  • तारीख - २० जुलै

  • स्थळ - गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-७, सिडको

  • वेळ - दुपारी १२ वाजता

असे आहेत स्पर्धेचे नियम

  • स्पर्धकांना १८ जुलैपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे.

  • स्पर्धेत १८ वर्षांवरील तरुणी, महिला सहभागी होऊ शकतात.

  • स्पर्धकांनी सर्व साहित्य आणि मेंदी काढण्यासाठी

  • आपला जोडीदार सोबत आणणे अपेक्षित आहे.

  • स्पर्धेसाठी स्पर्धकांना दोन तास दिले जातील.

  • परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT