वाळूज (जि.औरंगाबाद) : अपहरण झालेल्या तीन महिन्याच्या बाळासह त्याची आई व नातेवाईक. 
छत्रपती संभाजीनगर

बाळ सुखरूप मिळताच आईने हंबरडा फोडत घेतले कुशीत

रामराव भराड

वाळूज महानगर (जि.औरंगाबाद) : अवघ्या तीन महिन्याच्या चिमुकल्याचे पित्यानेच अपहरण करून पळ काढल्यानंतर पोटच्या गोळ्यासाठी आईने पोलिसांच्या मदतीने परिसर पिंजून काढला. दरम्यान, पोलिस आपल्या मागावर असल्याचे कुणकुण लागताच घाबरलेल्या आरोपीने चिमुकल्याला रांजणगाव (शेणपुंजी) (Waluj) येथील त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याने अखेर पंधरा तासानंतर (Aurangabad) चिमुकला पोटचा गोळा मिळाल्याने आईसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पत्नी अपर्णा चिमुकल्या बाळाला (Crime Against Child) घेऊन माहेरी जात असताना आरोपीने त्यांची रिक्षा रस्त्यात अडवून तीन महिन्याच्या बाळाचे शनिवारी अपहरण केले. त्यानंतर पोटच्या गोळ्यासाठी अपर्णाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी परिसर पिंजून काढत असताना आरोपीचे करमाळा (ता. जि. नगर) येथे लोकेशन मिळाले.

त्यामुळे विवाहितेसह तिचे नातेवाईक पोलिसांना घेऊन करमाळ्याला गेले. दरम्यान पोलिस आपल्या मागावर आहेत, आपण पकडले गेल्यास आपल्याला पोलीस मारहाण करतील, शिवाय तुरुंगाची हवाही खावी लागेल, या धाकाने आरोपी संदीप कदमने रांजणगाव (शेणपुंजी) येथे असलेल्या मामा व आजी यांच्या हवाली तीन महिन्याच्या चिमुकल्याला केले आणि तेथून पळ काढला. त्यानंतर मामा व आजीने अपर्णा आणि त्यांच्या नातेवाईकाला बाळ मिळाल्याची माहिती दिली. त्यामुळे अपर्णा व तीचे नातेवाईक रांजणगाव येथे आले. बाळ सुखरूप मिळताच अपर्णाने हंबरडा फोडत बाळाला कडकडून मिठी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT