छत्रपती संभाजीनगर

बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी १० हजारांचे सानुग्रह अनुदान द्या

CD
बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान द्या ------ वडार समाज संघाची मागणी; नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याबाबत निवेदन --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १२ : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि रोजगाराच्या अभावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच कामगारांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशी मागणी वडार समाज संघाच्या वतीने करण्यात आली. वडार समाज संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सानुग्रह अनुदानाबरोबरच बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणातील विलंब दूर करून प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करावी, सेतू सुविधा केंद्रांमार्फत होणारी नोंदणी बंद करून थेट नोंदणी व्यवस्था सुरू करावी, कौशल्य वृद्धी विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात यावे अशा विविध मागण्याही करण्यात आल्या. मागील वर्षी शासनाने बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून आता घोषणा नकोत, कामगारांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा. कामगारांच्या नावाने योजना जाहीर करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. पात्र कामगारांना विनाकारण कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. नोंदणीतील अडथळे दूर करून कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अशी भूमिका मुद्दे यांनी मांडली. शासनाने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वडार समाज संघाच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी रमाकांत मुद्दे, राम आलाकुंटे, कृष्णा धोत्रे, बाबासाहेब भांडेकर, सचिन वाडीकर, आकाश मुद्दे, रवी भांडेकर, लखन वाडीकर आदी उपस्थित होते. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT