Sakal Impact sakal
छत्रपती संभाजीनगर

Sakal Impact : वनरक्षक बदली प्रकरणात अधिकाऱ्याला अभय!

जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७० वनरक्षकांच्या बदल्यांसाठी आर्थिक देवाणघेवाण झाली होती. याप्रकरणी प्रादेशिक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पैसे घेतल्याचा आरोप संघटनांनी केला होता.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७० वनरक्षकांच्या बदल्यांसाठी आर्थिक देवाणघेवाण झाली होती. याप्रकरणी प्रादेशिक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पैसे घेतल्याचा आरोप संघटनांनी केला होता. एवढेच नव्हे, तर काही संघटनांनी त्याचे पुरावे तयार ठेवले होते.

हा विषय ‘सकाळ’ने लावून धरल्यानंतर तत्काळ वनरक्षकांच्या बदल्या झाल्या. तसेच बदल्यांसाठी घेतलेले पैसेही परत देण्यात आले. याप्रकरणी संघटनांनी आरोप केलेल्या अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्या. मात्र, काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला याविषयी तक्रार केली जाणार आहे.

ज्या अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आला, तो सुटीवर आहे. मागील वनरक्षकांच्या बदल्यांच्या काळातही तो अधिकारी सुटीवर गेला होता. यावेळी वनरक्षकांच्या भरतीवेळी सुटीवर असल्याने यामागेही काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा वनविभागाच्या कार्यालयात सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर वनपरिक्षेत्रातील एक कर्मचारी त्या अधिकाऱ्याच्या दिमतीला असतो.

कुठे काय सुरू आहे, बदल्यांसह शहरातील आरा मशीनमध्ये किती वाहने येतात, याची माहिती तो कर्मचारी त्या अधिकाऱ्याला पुरवतो. यामुळे या अधिकाऱ्यासह त्याला माहिती देणाऱ्यांची मागणीही बुलंद छावा मराठा युवा संघटनेतर्फे करण्यात आली. यापूर्वीही दिलेल्या निवेदनानुसार कुठलीच कारवाई न झाल्याने आता आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचेही या संघटनेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT