लस sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लस न घेता रस्त्यावर याल तर ५०० रुपये दंड

महापालिका प्रशासकांनी काढले आदेश; बुधवारपासून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. आता लसीचा पहिला डोस न घेता व दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी हे आदेश काढले आहेत. बुधवारपासून (ता. १५) महापालिकेच्या नागरिक मित्र पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे.

केंद्रासोबतच राज्य सरकारनेही शंभर टक्के लसीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या, तसेच लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दंड करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला आहे. शहरात बुधवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होईल. सोमवारी महापालिका प्रशासकांनी यासंदर्भात आदेश काढले. कारवाईसाठी पुन्हा एकदा नागरिक मित्र पथके कार्यान्वित केली जाणार आहेत.

५०० रुपयांचा भरावा लागणार दंड

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणारे व दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचा शोध नागरिक मित्र पथके घेणार आहेत. अशा नागरिकांना तब्बल ५०० रुपये दंड लावला जाणार आहेत. यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावला जात होता.

एकही डोस न घेतलेले दोन लाख ११ हजार

महापालिकेला नागरिकांच्या लसीकरणासाठी १० लाख ५५ हजार ६०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यातील आठ लाख ४४ हजार जणांनी पहिला डोस घेतलेला आहे तर एकही डोस न घेतलेले दोन लाख ११ हजार नागरिक आहेत. त्यांचा शोध प्रशासनाला घ्याला लागणार आहे. तसेच दुसऱ्या डोसची मुदत संपल्यानंतरही ६७ हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy Final: जम्मू-काश्‍मीरच्या अजिंक्यपदाची औपचारिकता; पहिल्यावहिल्या रणजी करंडकाचे जेतेपद निश्‍चित

Latest Marathi News Live Update : कुसळंब गोळीबार प्रकरणी तिघांना अटक, पोलिसांनी पाठलाग करत केले जेरबंद

'अनिल कपूरसारखा नवरा नको!' माधुरी दीक्षितने दिलेलं स्पष्ट उत्तर, म्हणालेली... 'आम्ही फक्त...'

पोर्शे कार अपघात प्रकरण, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Kashi Kund Inscription : कोकणात इतिहासाचा अनमोल ठेवा! गंगातीर्थातील काशीकुंडात सापडला प्राचीन शिलालेख, नेमकं काय लिहिलंय त्यावर? 16 व्या शतकातील कनेक्शन?

SCROLL FOR NEXT