first electric railway engine test successful Washim Hingoli railway line
first electric railway engine test successful Washim Hingoli railway line sakal
छत्रपती संभाजीनगर

वाशीम-हिंगोली रेल्वे मार्गावर धावले विजेवरील पहिले इंजिन

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : वाशीम- हिंगोली या ४७ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. यापूर्वी अकोला ते वाशीम दरम्यान विद्युत इंजिनद्वारे चाचणी यशस्वीरीत्या झाली. या मार्गावरून शनिवारी रात्री वाशीम ते हिंगोली दरम्यान विजेवरील पहिले इंजिन शंभर किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावले.

रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपये मंजूर झाले. अलाहाबाद येथील केईसी कंपनीतर्फे अकोला- हिंगोली या १२७ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. २५ हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवाह कार्यान्वित करण्यात आला आहे. पुढे हिंगोली ते वसमत व पूर्णेपर्यंत विद्युत पोल उभे करून तारा जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. १७ मार्च २०२१ ला अकोला ते लोहगढ व १० जानेवारी २०२२ ला लोहगढ ते वाशीम स्थानकापर्यंत विजेवरील इंजिनद्वारे विद्युतीकरणाची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली.

त्यानंतर शनिवारी रात्री विजेवरील पहिले इंजिन वाशीम येथून १०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावले. हिंगोली स्थानकावर रात्री ८.३७ ला ते पोचले. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विद्युत अभियंता कृष्णा धर्मेंद्र, सहाय्यक अभियंता तसेच केईसी कंपनीचे पी. राजू, धरम गौतम पेरूमल, प्रफुल्ल सावरकर, जुनैदकमर आदींनी स्वागत केले. स्टेशन मास्तर रामसिंग मीना, आलोक नारायण, भीमराव धुळे, रियाज अली, शोएब वासेसा उपस्थित होते. रात्री नऊला रेल्वे इंजिन वाशीमकडे मार्गस्थ झाले.

प्रवासी संघटनेतर्फे समाधान

रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल हिंगोली येथील प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले. संघटनेने अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू आदींनी रेल्वे विभागाचे आभार मानले. अकोला रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचीही मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT