Five cartridges with village pistol seized
Five cartridges with village pistol seized  Sakal
छत्रपती संभाजीनगर

गावठी पिस्तुलासह पाच काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा

पिशोर - पिशोर पोलिसांनी बुधवारी (ता.२२) एका तरुणाच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी तरुणासह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेण्यात आले. विनोद सरदार परदेशी (वय ३५, रा.जामडी ता.चाळीसगाव जि. जळगाव), या तरुणासह एक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, एक कार (क्र.एम.एच-२० बीयएन-६०४४) चिंचोली लिंबाजीकडून नागदकडे वेगाने जात आहे आणि त्यात एका तरुणासह महिला असून तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह सावरगाव फाटा येथे नाकाबंदी केली. या ठिकाणी सांगितलेल्या वर्णनाची एक कार (एम.एच-२० बी.एन- ६०४४) अडविण्यात आली. कारचालकाची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना एक गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच पाच जिवंत काडतुसे व एक मोबाईल आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून कार सह पिस्तूल, काडतुसे व मोबाईल असा एकूण २५५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी आरोपी विनोद सोबत कारमध्ये असलेल्या त्याच्या प्रेयसीचा सुद्धा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विनोद सह तिच्याविरुद्ध सुद्धा पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सतीश बढे अधिक तपास करत आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस नाईक सोपान डकले, लालचंद नागलोद, पोलिस अंमलदार संदीप चव्हाण, दीपक सोनवणे, अन्सार पटेल, करण म्हस्के, साईनाथ घुगे, कौतिक सपकाळ यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT