News
News 
छत्रपती संभाजीनगर

वयच काय त्यांचं? अवघं एक अन् तीन वर्षे, तरीही कोरोनासुराला केले चित

मनोज साखरे

औरंगाबाद : त्यांचे वयच काय? हसायचे, रुसायचे अन् थकेस्तोर मनसोक्त खेळायचे. झालेच तर हट्ट पूर्ण व्हावा, यासाठी रडायचे. पण, कोरोनासुराने त्यांनाही गाठलेच. रडत-रडत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. जीव की प्राण असलेल्या आई-वडिलांपासून कोरोनाने ताटातूट केली. डॉक्टर आणि पालकांनी घेतलेल्या काळजीमुळे पाच चिमुकल्यांनी कोरोनासुराला हरवले. यात तीन वर्षांतील तीन मुली तर दहा वर्षांतील दोन मुलांचा समावेश आहे.

कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असतानाच शहरातील सिल्कमिल कॉलनीतील एक वर्षाची चिमुकली, हुसेन कॉलनीतील तीन वर्षांच्या दोन मुली, सादातनगरचा आठ आणि संजयनगर, मुकुंदवाडी येथील दहा वर्षांच्या दोन अशा पाच मुलांना कोविड-१९ ची बाधा झाली. पण, पूर्ण उपचारानंतर या मुलांनी विषाणूयुद्धात लढत कोरोनावर यशस्वी मात केली. शहरातील जिल्हा रुग्णालयातून रविवारी (ता. २४) त्यांना व इतर २३ जणांना सुटी देण्यात आली.

मुलांना दूर कसं ठेवणार?
मुलं म्हटली की त्यांचा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आई-वडील आजी-आजोबांना तर ते अगदी चिकटून राहतात. पण, कोरोनाचा कहर झाला आणि दोन व्यक्तीत ठरावीक अंतर राखायचेच असा नियम निघाला. मोठ्यांचे ठीक. पण, लहान मुलांना दूर कसे ठेवणार, हा प्रश्न आहेत. म्हणूनच काय की आई, वडील इतर आप्तेष्टांच्या संपर्कातून ही लेकरं बाधित झाली.

घरापासून दुरावली होती पाखरं
कुणाचे आई-वडील, कुणाचे आजी-आजोबा बाधित. त्यांच्यापासून ही मुलंही बाधित झाली. कुणाचे फक्त चिमुकलेच बाधित झाले. त्यांना आपल्या घरापासून १० ते १४ दिवस दूर राहावे लागले. पीपीई कीट घालून त्यांना न्यायला आरोग्य योद्धे आले. तेव्हा या योद्ध्यांना या चिमुकल्यांची स्थिती पाहावत नव्हती.

काही मुलांचे पालक केवळ पोटच्या गोळ्याखातर स्वतःला बाधा होईल याची पर्वा न करता रुग्णालयात बसून होते. अखेर रविवारचा दिवस उजाडला आणि या मुलांच्या चेहऱ्यावर चैतन्य घेऊन आला. त्यांच्या सुटी वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपचार करणारे डॉ. पद्मजा सराफ, डॉ. कांबळे, डॉ. शिंदे, डॉ. सुरामवाड उपस्थित होते.

यांना झाली सुटी

  • सिल्कमिल कॉलनी : २८ वर्षीय तरुण, एक वर्षीय मुलगी.
  • हुसेन कॉलनी : ५०, ६२,६८ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय दोन तरुणी, ५७, ३१, ४८ वर्षीय महिला, ३ वर्षीय दोन मुली.
  • सदानंद कॉलनी : ५० वर्षीय पुरुष
  • रामनगर : ५५ वर्षीय महिला.
  • पुंडलिकनगर : ६० वर्षीय पुरुष
  • संजयनगर, मुकुंदवाडी :- १० वर्षीय मुलगा, ३२, ४० वर्षीय महिला.
  • भीमनगर : ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक
  • संभाजी कॉलनी : ५५ वर्षीय महिला
  • चौसर कॉलनी : ५० वर्षीय पुरुष
  • सादातनगर : ४१, २० वर्षीय तरुण, आठ वर्षीय मुलगा, २०, २८ वर्षीय तरुणी.
  • न्यायनगर : ५० वर्षीय महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT