fulanbri 11.jpg 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक : फुलंब्री तालुक्यातील तळेगावात पाच मुलींचा तलावात बुडून मृत्यू

नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील तळेगावात ह्दय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या तलावात पाच शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद (ता.भोकरदन) पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अशुबी लतीफ पठाण (वय ६), नाबिबाबी नवाज पठाण (वय ६), अल्फिदाबी गौसखा पठाण (वय ७) सॅनियाबी अस्लम पठाण (वय ६) व शब्बूबी अस्लम पठण (वय ५) असे मृत झालेल्या मुलींचे नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यात जालना जिल्ह्यातील तळेगावचा समावेश झालेला आहे. तळेगावला तालुका फुलंब्री असला तरी पोलीस ठाण्याची हद्द हसनाबाद (ता.भोकरदन)आहे. तळेगाव गावाच्या शिवारात एक तळेगाव वाडी म्हणून शेतवस्ती आहे. या शेतवस्तीवर सुमारे २० ते २५ कुटुंब राहतात. या वस्तीला लागून एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावाच्या परिसरात पाच ते सात वयोगटातील पाच मुली खेळत होत्या.

त्या पोहण्याच्या उद्देशाने तलावात उतरल्या असताना त्या पाचही मुली तलावात बुडाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच परिसरातील नागरिकांनी पाचही मुलींना बाहेर काढले. उपचारासाठी फुलंब्री येथे आणले. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

सदरील मुलींना पुन्हा तळेगाव येथे नेण्यात आले.  संबंधित मुलींना भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, हसनाबाद पोलिस स्टेशनचे संतोष घोडके इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. 


गावावर शोककळा 
एकाच गावातील ८ ते १४ वयोगटातील पाच मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने तळेगावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT