sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : तोतया डॉक्टरांचा प्राचार्याला साडेपाच लाखांचा गंडा

या प्रकरणातील फिर्यादी हे बीड येथे प्राचार्य आहेत. या प्राचार्यांच्या अंगावर पांढरे डाग आहेत. ६ नोव्हेंबरला ते पत्नीला कामानिमित्त सोडण्यासाठी औरंगपुरा भागात गेले होते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अंगावरचे पांढरे डाग बरे करतो, असे आमिष दाखवत दोन तोतया डॉक्टरांनी प्राचार्याला पाच लाख दहा हजारांचा गंडा घातला. नोव्हेंबर २०२३ पासून हा प्रकार सुरु होता. या प्रकरणी प्राचार्याच्या पत्नीने दामिनी पथकाला माहिती दिल्यानंतर पथकाने सोमवारी सापळा रचून दोन्ही तोतया डॉक्टरांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील फिर्यादी हे बीड येथे प्राचार्य आहेत. या प्राचार्यांच्या अंगावर पांढरे डाग आहेत. ६ नोव्हेंबरला ते पत्नीला कामानिमित्त सोडण्यासाठी औरंगपुरा भागात गेले होते. यावेळी ते घरी परतत असताना त्यांना एकाने अडवले. त्याने प्राचार्यांच्या अंगावरील डागाची चौकशी करीत आपले नाव शिव शर्मा असल्याचे सांगितले. आपल्या ओळखीचे डॉ. खान असून ते हे डाग बरे करु शकतात, असे सांगत मोबाईल क्रमांक घेतला. यानंतर काही वेळातच प्राचार्यांना खान नावाने कॉल आला. दुसऱ्या दिवशी प्राचार्यांची भेट घेत हे डाग बरे होऊ शकतात, असे सांगितले.

यानंतर उपचाराच्या नावाखाली त्याने प्राचार्यांकडून ३ लाख ९९ हजार आणि औषधीच्या नावाखाली १ लाख १० हजार रुपये उकळले. उपचार केल्यानंतरही फरक पडला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे प्राचार्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. दरम्यान, सोमवारी डॉ. रंजीत सलीम खान आणि शिव शर्मा हे आरोपी पुन्हा पैसे उकळण्यासाठी प्राचार्यांच्या घरी येणार होते. त्यांच्या पत्नीने दामिनी पथकाला ही माहिती दिली. यावरुन पथकाने सापळा रचून या दोन तोतया डॉक्टरांना ताब्यात घेत अटक केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पीएसआय कांचन मिरधे, जमादार निर्मला निंभोरे, पोलीस अंमलदार सुरेखा कुकलारे, आयोध्या दौंड, प्रियंका भिवसने, मनीषा बनसोडे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT