फुलांच्या बाजारात उत्साहात घमघमाट
--
शेवंती, गुलाब महागले, झेंडू काहीस स्वस्त; ठोक बाजारात आवक वाढली
--
जाधववाडी, ता. १७ : महालक्ष्मी अर्थात गौराईचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात असल्याने पूजा आणि सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी वाढली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर जाधववाडी बाजार समितीतील फूल बाजारात गुरुवारी (ता. १७) विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढलेली दिसून आली. तरीही मागणी अधिक असल्याने त्यांच्या भावातही काहीशी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विशेषतः शेवंती आणि झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
जाधववाडी बाजार समितीतील फूल बाजारातील व्यापारी दिलीप जौक यांनी सांगितले, ठोक बाजारात शेवंतीचे भाव प्रतिकिलो ५० ते १५० रुपये, झेंडू १० ते ३० रुपये, अष्टर १३० ते १५० रुपये, गुलाब १५० ते ३०० रुपये, लाल शेवंती (पर्पल) १०० रुपये, तर गलांड्याचे भाव ५० रुपये आहेत. दरम्यान, किरकोळ बाजारात फुलांचे भाव ठोक बाजाराच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले. किरकोळ बाजारात शेवंती १६० रुपये, झेंडू ४० रुपये, लाल शेवंती १५० रुपये, गुलाब ३०० रुपये, तर गलांडा १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याचे किरकोळ विक्रेते बळिराम हरणे यांनी सांगितले. गौरी पूजनासाठी शेवंती आणि झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
----
हारांनाही मागणी
गौराईच्या सजावटीसाठी तसेच पूजेसाठी फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे. झेंडूचा दोन ते तीन फुटांचा हार ५० ते ६० रुपये, गुलझडीचा हार १५० ते २०० रुपये, गुलछडी आणि झेंडूचा हार ७० ते ८० रुपये, तर गुलाबाच्या फुलांचा हार ३५० ते ४०० रुपयांना विकला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.