छत्रपती संभाजीनगर

चारा उत्पादनासाठी पुढाकार

CD
फोटो क्रमांक OSM26B07261 --------- चारा उत्पादनासाठी गाळपेर जमिनीचा वापर मांजरा प्रकल्पाच्या क्षेत्राची प्रशासनाकडून पाहणी, बियाणेही उपलब्ध करून देणार धाराशिव, ता. २३ (बातमीदार) ः पावसाअभावी शेतातील पिके बाधित झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चारा उत्पादन वाढविण्यासाठी गाळपेर जमिनीचा उपयोग केला जाणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर करून चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी गुरुवारी (ता. २२) खडकी (ता. कळंब)या गावाजवळील मांजरा सिंचन प्रकल्पाच्या जलाशयालगतच्या गाळपेर जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून गाळपेर जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार हेमंत ढोकले यांना आवश्यक त्या सूचना केल्या. शेतकऱ्यांसाठी पशुधन हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून, त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हाधिकारी पुजार यांनी मांजरा प्रकल्पाच्या जलाशयालगत उपलब्ध असलेल्या गाळपेर जमिनीचा चारा उत्पादनासाठी कसा उपयोग करता येईल, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. गाळपेर जमिनीवर चारा पिकांची लागवड केल्यास उपलब्ध जमिनीचा उत्पादक वापर होण्याबरोबरच पशुधनासाठी आवश्यक चारा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन गाळपेर जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक चारा पिकांचे बियाणे पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चारा पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक पाण्याच्या वापरास जलसंपदा विभागामार्फत परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध होणार आहे. उत्पादित होणारा चारा संबंधित शेतकऱ्यांना स्वतःच्या जनावरांसाठी वापरता येणार आहे. अतिरिक्त चारा उपलब्ध झाल्यास तो चाऱ्याची गरज असलेल्या अन्य शेतकऱ्यांनाही पुरविता येणार आहे. त्यामुळे स्वतःच्या पशुधनाची चाऱ्याची गरज भागविण्याबरोबरच गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीही चारा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ----------- स्थानिक स्तरावर प्रयत्न शासनाकडून बाहेर राज्यातून चारा उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, स्थानिक स्तरावरही अशाप्रकारे चारा निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेलच, शिवाय राज्य शासनावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्यासही मदत होणार आहे. -------- -------------पूर्ण-------------राजेंद्रकुमार जाधव----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Satej Patil : गोकुळमध्ये कोरमचा पेच सुटणार? गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी २५ संचालक एकत्र येतील; सतेज पाटलांना विश्वास

अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांना बॉम्बहल्ल्याची धमकी; दादरमधील चार शाळांनाही ईमेल, तपास सुरू

PM Kisan 24th Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, 'या' दिवशी खात्यात येणार २००० रुपये; 'पीएम किसान' च्या हप्त्याची तारीख जाहीर

Marathi News Live Updates: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत पाटील मैदानात

Cybercrime: दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; पाच बँक कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT