छत्रपती संभाजीनगर

गुरांसाठीचा चारा जिल्ह्यातच

CD
जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी ---------- जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; हिरवा-वाळलेला चारा, गवत विक्रीवरही निर्बंध सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ७ : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने खरीप हंगामातील चारा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आगामी काळात संभाव्य चारा टंचाईची स्थिती निर्माण होऊ नये, जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेला हिरवा व वाळलेला चारा, गवत तसेच वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या, दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध चारा सुरक्षित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश, २००१ मधील तरतुदींनुसार हा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात उपलब्ध असलेला हिरवा व वाळलेला चारा, गवत आणि वैरण यांची जिल्ह्याबाहेर विक्री तसेच वाहतूक करता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना आगामी काळात चारा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध साठ्याचे संरक्षण होणार आहे. …. सहा ऑक्टोबरपासून आदेश लागू जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश ६ ऑक्टोबरपासून तत्काळ लागू करण्यात आला असून, पुढील आदेशापर्यंत तो अस्तित्वात राहणार आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. संभाव्य चारा टंचाईच्या काळात जिल्ह्यातील पशुधनाला चारा उपलब्ध राहावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT