औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला जनतेला आवाहन करण्यात येणारा फलक.  
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषदेत येण्याएवजी जनतेने घ्यावा फोनवर फॉलोअप 

मधुकर कांबळे

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकांनी कार्यालयात येण्याएवजी ई मेलवर पत्रव्यवहार करावा. कामाचा फॉलोप घेण्यासाठी दुरध्वनीवर संपर्क करा असे आवाहन केले आहे. 

ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्याची गरज भासू नये यासाठी ही मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आवाहन करणारा फलक लावण्यात आला आहे. 

सोमवारपासून (ता. २३) कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना अभ्यागतांना परिसरात व कार्यालयात प्रवेश बंद केला आहे. जिल्हा परिषदेशी संबंधित असलेल्या कामकाजासंबंधी महत्त्वाची निवेदने, अर्ज आदी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करून घेण्यात येत आहे. 

त्या बॉक्समधील निवेदनांची त्वरित दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येईल. अभ्यागतांनी शासकीय कार्यालयांतील गर्दी टाळण्यासाठी सद्यःस्थिती पाहता कार्यालयाला भेट देण्याचे टाळावे; तसेच आपल्या कामासाठी gadzpaurangabad@gmail.com  या ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करू शकतील; तसेच ०२४०-२३३१५७१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून विचारणा करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगून कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अभ्यागतांना येण्याचे टाळावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे. 

मार्च अखेर असल्यामुळे शासकीय कार्यालयांसाठी महत्वाचा महिना आहे. मात्र कोरोनामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. सुरूवातीला ५० टक्के कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याचे शासनादेश होते. नंतरची परिस्थिती पाहता यात बदल करुन ५० टक्केएवजी ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात असलेल्या १४ विभागांमध्ये पाच टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या प्राधान्यक्रमानुसार बोलाविण्यात येत आहे. त्याच त्या कर्मचाऱ्यांना बोलाविण्याऐवजी रोटेशन पद्धतीने कामावर बोलाविण्यात यावे, अशा विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

SCROLL FOR NEXT