parbhani sakal
छत्रपती संभाजीनगर

Parbhani News : सेनगाव येथील शेतकऱ्यांकडून अन्नत्याग आंदोलन

कर्जमाफीवरून रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

सेनगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. ८) अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना पीक विमा, दुष्काळी अनुदान मिळाले नाही. यामुळे सरकारने कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

अवयव विक्रीसाठी मुंबईत गेल्यानंतरही सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मुंबईतल्या समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर बाहेर येताच या शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आमच्यावर अवयव विक्रीची वेळ का ? आली याबाबत चर्चा केली. यामुळे हा विषय राज्यभरात चांगलाच चर्चेत आला आहे.

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विमा, दुष्काळी व कर्जमाफीवरून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील अवयव विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

तसेच रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला आहे. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, बबन खिल्लारी, रामभाऊ कावरखे, नारायण रवणे, संतोष वैद्य, शिवाजी कावरखे, बाळू जाधव, मदन कावरखे, शोभाबाई लाभाडे, राधाबाई भूकसे, शांताबाई लाभाडे आदींसह शेतकरी उपस्थित उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT