चाराबियाणे १०० टक्के अनुदानावर मिळणार
नांदेड, ता. १६ : चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, सिंचनाची सुविधा असलेल्या आणि वैरण पिकांची लागवड करण्यास इच्छुक पशुपालकांनी गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आगामी काळात पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. संभाव्य चाराटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच वैरण लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र पशुपालकांना वैरण बियाणे पूर्णतः अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
वैरण पिकांच्या लागवडीसाठी सिंचनाची सुविधा असणे आणि लागवड करण्याची तयारी असणे, या प्रमुख अटी आहेत. त्यामुळे पात्र व इच्छुक पशुपालकांनी गुगल फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावेत.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध राहावा, यासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून वैरण पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे आगामी काळातील चाराटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.