छत्रपती संभाजीनगर

फोरब्स कंपनीने केला मनपा शाळेचा कायापालट!

CD
(फोटो ः ABD26J81041) ---- छत्रपती संभाजीनगर ः फोर्ब्स कंपनी अँड शापूरजी पालनजी ग्रुपच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात आलेली शाळेची इमारत. ------ फोर्ब्स कंपनीकडून मनपा शाळेचा कायापालट! २२ वर्गखोल्यांची भव्य इमारत, संगणक लॅब आणि ई-लायब्ररीमुळे ठरतेय ‘मॉडेल स्कूल’ छत्रपती संभाजीनगर, ता. ११ ः महापालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, एन-७ सिडको शाळेची नूतन वास्तू सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज झाली. फोर्ब्स कंपनी अँड शापूरजी पालनजी ग्रुपच्या सामाजिक दायित्व निधीतून तब्बल सात कोटी रुपये खर्चून ही नवी इमारत पूर्ण झाली आहे. महापालिकेच्या सिडको एन-७ शाळेची जुनी इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. तत्कालीन मुख्याध्यापिका हेमलता भुयार यांनी फोर्ब्स कंपनीशी संपर्क साधून सीएसआर फंड मिळवला. त्यानंतर चार टप्प्यांत हे इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात ४ वर्गखोल्या बांधण्यात आल्या. त्यानंतर २०२२ मध्ये ५, २०२५ मध्ये तिसऱ्या टप्प्यात ६ आणि २०२६ मध्ये चौथ्या टप्प्यात ७ वर्गखोल्या बांधण्यात आल्या. आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे व शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज शाळा तयार झाली आहे. विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी ‘डी मार्ट एज्युकेशन फाउंडेशन’ने २० संगणकांची अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आणि संगणक शिक्षक उपलब्ध करून दिला आहे. दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालय व एक ग्रंथपाल दिला आहे. प्रशासकीय अधिकारी संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक मनोज अग्रवाल यांच्या प्रयत्नाने ऑगस्ट २०२६ पासून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोफत शहर सिटी बस सेवा सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्तेत मोठी वाढ झाली आहे. ---------- अवकाशातील भरारी ते वर्ल्ड रेकॉर्ड शिक्षिका मंगला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची विद्यार्थिनी २०२५ मध्ये ‘इस्रो’च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवडली गेली होती. यापूर्वी २०२१ मध्ये शिक्षिका वैशाली देशमुख व महापालिकेच्या १२ विद्यार्थ्यांच्या चमूने तयार केलेला सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी या शाळेतील विद्यार्थिनीची निवड झाली होती, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT