छत्रपती संभाजीनगर

वनधनाला मिळेना ''जनधनाची'' साथ; बचत गटाची तीन वर्षांपासून धडपड!

CD
((फोटो क्रमांक - ABD26J82128 )) ----- ‘वनधनाला मिळेना ‘जनधनाची’ साथ --- वन विभागाच्या आवारातील विक्री केंद्राची अवस्था, बचत गटाची तीन वर्षांपासून धडपड ---- छत्रपती संभाजीनगर, ता. २६ : निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या अस्सल वनौषधी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी कन्नड तालुक्यातील ‘आई तुळजाभवानी महिला बचत गटा’तर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वर्षांपासून ‘वनधन जनधन विक्री केंद्र’ चालविले जात आहे. वन विभागाच्या सहकार्याने सुरू असलेल्या या उपक्रमातून आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या वनौषधींचा प्रसार केला जात असला, तरी अपेक्षेनुसार नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या केंद्रासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. परिणामी, केंद्र बंद करण्याची वेळदेखील येऊ शकते. छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वेस्टेशन रोडवरील प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालय परिसरात हे विक्री केंद्र तीन वर्षांपासून सुरू आहे. नफ्यापेक्षा वनौषधींचा प्रसार आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, हेच यामागील मुख्य ध्येय आहे. याविषयी केंद्राच्या संचालिका अनिता मनगटे यांनी सांगितले, की अनेकदा यातून खूप मोठा आर्थिक नफा मिळतोच असे नाही; परंतु लोकांपर्यंत अस्सल वनौषधी पोचल्या पाहिजेत, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. वन विभागाकडून आम्हाला मोलाचे सहकार्य मिळत आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात खात्रीशीर वनौषधी सहज उपलब्ध होऊ शकतील. सध्या वन विभागाकडून बचत गटाने जागा भाड्याने घेतली आहे. महिन्याकाठी खूप काही विक्री होऊन नफा मिळत नाही. परंतु, काही वनौषधी घेण्यासाठी लोक आवर्जून या ठिकाणी येतात. गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाच्या संशोधन केंद्राकडूनदेखील वनौषधींची मागणी आमच्याकडे केली जाते. --- उपलब्ध वनौषधी - गुळवेल (गिलोय) पावडर - वडी, हिरडा - बेहडा पावडर - कडुनिंब आणि तुळस पावडर - औषधी काढा - गोंडबी - चारोळी ---- नागरिकांना आवाहन निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आणि आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या विविध वनौषधींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रादेशिक वन अधिकारी कार्यालय परिसरातील या ‘वनधन जनधन विक्री केंद्राला’ आवर्जून भेट दिली तर याला चांगली चालना मिळेल, असेही कारभारी जाधव म्हणाले. ---- ((कोट)) संथगतीने चालणारा व्यवसाय विक्री केंद्राला प्रतिसाद अजिबातच नाही, असे म्हणता येणार नाही. हा संथगतीने निरंतर चालणारा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे, आमच्याकडे येणारे ग्राहक एकदा जोडले गेल्यानंतर कायमस्वरूपी संपर्कात राहतात. - कारभारी जाधव, विक्री केंद्राचे संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

SCROLL FOR NEXT