छत्रपती संभाजीनगर

अस्तित्वात नसलेल्या संचिकेची बनावट नक्कल; न्यायालयात सादर केल्याचा आरोप:

CD
नसलेल्या संचिकेची बनावट नक्कल; एकाविरुद्ध गुन्हा कळंब, ता. ६ (बातमीदार) : तहसील कार्यालयात अस्तित्वात नसलेल्या संचिकेची बनावट व खोटी साक्षांकित नक्कल तयार करून त्यावर शासकीय शिक्क्यांचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी तेरखेडा (ता. वाशी) येथील गौतम रंगनाथ कुंभार याच्याविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदर कथित बनावट कागदपत्रे वाशी येथील न्यायालयात दिवाणी दावा क्र. ९०/२००९ मध्ये सादर करून शासन व न्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महसूल विभागातील सहाय्यक तथा अभिलेखपाल विद्या किशोर रणदिवे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. तहसील कार्यालयाच्या अभिलेखात संचिका अस्तित्वात नसतानाही तिची साक्षांकित प्रत तयार करून न्यायालयीन प्रक्रियेत वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास कळंब पोलिस करीत आहेत. ............... वीज प्रकल्पाच्या तारांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा कळंब, ता. ६ (बातमीदार) : तेरखेडा शिवारात सुरू असलेल्या वीज प्रकल्पाच्या कामावरील ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी करून मोठ्या प्रमाणात तारांचे नुकसान केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे एक लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. श्याम अजीनाथ शिंदे, आकाश श्रीरंग पवार, पवन कालिदास काळे, अंगद प्रल्हाद शिंदे आणि जाकेर निजाम शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरला पहाटे तेरखेडा शिवारातील वीज प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी चोरी झाली. पोलला जोडलेल्या सुमारे १९० मीटर ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेण्यात आल्या. तसेच सुमारे ५०० मीटर तारांचे नुकसान करण्यात आले. राहुल मोहन पिसाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT