MP Ramkrushna Baba Patil 
छत्रपती संभाजीनगर

काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन

माधव इतबारे

औरंगाबाद/ वैजापूर : काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी (ता. दोन) सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता दहेगाव (ता. वैजापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.


काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती मधुमेहाचा त्रासामळे काही दिवसांपूर्वी  खालावली होती. त्यामुळे त्याना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील दहेगाव येथे १९७० साली सरपंच पदापासून आपल्या राजकरणाचा श्रीगणेशा करणारे रामकृष्ण बाबा यांच्या कारकीरदीला खरा बहर आला तो १९८५ साली. यावर्षी त्यांनी वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले. हे पद १९९५ पर्यंत त्यांनी कायम ठेवले.

याशिवाय १९९९ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर खासदारकी मिळवली. शिवसेनेचे  प्रदीप जैस्वाल  यांचा त्यांनी पराभव केला होता. रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती पद, तर २५ वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉप-आप बँकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले. सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात  त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अप्पासाहेब पाटील, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील ही दोन मुले,  सुन तथा जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, दोन मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT