Chandrakant Khaire Sakal
छत्रपती संभाजीनगर

Video Viral : 'साहेब तुमचा आवाज कमी झालाय'; खैरेंनी क्षणात फोनवरच फोडली डरकाळी

खैरेंची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सध्या चांगलेच चर्चेत असून त्यांची कार्यकर्त्यांसोबत संभाषण करतानाची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते फोनवरच डरकाळी फोडताना जिसत आहेत. ही ऑडिओ क्लीप अनेकांनी शेअर केली आहे. पण या ऑडिओ क्लीपची पुष्टी सकाळ माध्यम करत नाही.

अधिक माहितीनुसार, एका कार्यकर्त्याने चंद्रकांत खैरे यांना कॉल करून अंबादास दानवे यांची तक्रार केली. त्याने दानवेंची तक्रार करताना सांगितलं की, संदीप गुरमे हे भ्रष्ट अधिकारी आहे, त्यांनी वाळूचा सत्यानाश केला असल्याचं अंबादास दानवे म्हणाले होते. पण आता ते अधिकारी क्राईम ब्रँचला आले आहेत.

ते आता पूर्ण शहराचा सत्यानाश करतील ना, मग दानवे आता गप्प का बसले बरं? ते फोन पण उचलत नाहीत. तुम्ही त्यांचे मोठे नेते आहेत ना, मग तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे ना?" अशी तक्रार या कार्यकर्त्यानी खैरे यांच्याकडे केली.

या तक्रारीनंतर चंद्रकांत खैरे यांना कार्यकर्ता म्हणाला की, साहेब तुमचा पहाडी आवाज आता कमी झाला आहे. त्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले, "माझा आवाज कमी झाला नाही, माझ्याएवढं कुणीच बोलत नाही. हे बघ, व्ह्याव... व्ह्याव... आला का आवाज?" असं खैरे म्हणाल्यावर कार्यकर्तासुद्धा हसू लागला.

दरम्यान, खैरे यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर संदिपान भुमरे यांची लोकसभा लढण्याची लायकी नाही असं वक्तव्य खैरे यांनी केलं होतं. खैरे हे कायम शिंदे गटातील नेत्यांवर आरोप करत असतात. तर आमच्या संपर्कात शिंदे गटातील नेते असल्याचा दावाही करत असतात. त्यानंतर त्यांची ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

Explained : ३०८ धावा अन् २ विकेट्स... तरीही प्रतिका रावलला वर्ल्ड कप विजयाचं मेडल का दिलं गेलं नाही? ICC चा नियम काय सांगतो वाचा

Frequent Urine Blockage: वारंवार थांबून थांबून लघवी होते? मग किडनी निकामी होण्यापूर्वी जाणून घ्या ही ‘धक्कादायक कारणं’!

Latest Marathi News Live Update : यश ढाका आता प्रकरणी आज बीडमध्ये जन आक्रोश मोर्चा

Luxury toilet seat : बापरे!!! एका ‘टॉयलेट सीट’ची किंमत तब्बल ८८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त

SCROLL FOR NEXT