Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून, निर्दयी घटनेचा व्हिडिओ आला समोर

एका तरुणाचे हातपाय बांधून चार-पाच जणांनी बेदम मारहाण केली.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गुन्हेगारी कृत्य थांबताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांची वचक गुन्हेगारांवर राहिली नसल्याची चर्चा सुरु आहे. धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. त्यात एका तरुणाचे हातपाय बांधून चार-पाच जणांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) टीव्ही सेंटर येथील शताब्दी नगरमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाचे हातपाय बांधून बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घडली आहे. (Four-Five People Brutally Beaten To Death Video Viral In Aurangabad)

मनोज शेषराव आव्हाड असे मृताचे नाव आहे. मनोज हा शताब्दीनगर भागातील माजी नगरसेवकाच्या लाॅनमध्ये कामाला होता. लाॅनमधील लायटिंग चोरल्याच्या संशयावरुन चार-पाच जणांनी त्याचे हातपाय बांधून काठ्यांनी बेदम मारहाण केली. मनोज ओरडत होता. पण त्या नराधमांना त्याची दया आली नाही. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला आणि तो मनोजच्या भावाला पाठवण्यात आला. गंभीर जखमी मनोजला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT