covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

'औरंगाबादमधील तब्बल चार लाख नागरिकांना कोरोनाचा धोका'

ऑगस्ट महिन्यात शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे लग्न, सभा-समारंभांवर निर्बंध कायम आहेत

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना ससंर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी शहरातील तब्बल चार लाख नागरिकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्गाची (covid 19 third wave auranagbad) ऑगस्ट महिन्यात भीती आहे, असे मत महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेची भिती कायम असून, त्यासाठी महापालिकेने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे.

यासंदर्भात विचारणा केली असता प्रशासक श्री. पांडेय म्हणाले, शहरात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या दहा लाख आहे. त्यापैकी तीन लाख ४० हजार नागरिकांनी लशीचे एक किंवा दोन्हीही डोस घेतले आहेत. एक लाख नागरिकांना कोरोना संसर्ग झालेला आहे. सुमारे दीड लाख नागरिक कोरोनाचे लक्षणे नसलेले रुग्ण होते. याचा एकत्रित विचार केला तर सुमारे सहा लाख नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडिज निर्माण झाल्या आहेत, त्यांना कोरोना संसर्गाची शक्यता कमी आहे. उर्वरित चार लाख नागरिकांना तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग होऊ शकतो.

ऑगस्ट महिन्यात शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे लग्न, सभा-समारंभांवर निर्बंध कायम आहेत. एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीत हे कार्यक्रम घेता येतील. अंत्यविधीसाठी निर्बंध आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे, त्या कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळून आले, तिसऱ्या लाटेत एवढे रुग्ण नसतील, असे पांडेय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT