छत्रपती संभाजीनगर

शेतमाल साठवणुकीसाठी मिळणार मोफत मार्गदर्शन

CD
मोठी सिंगल किंवा पट्ट्यात... शेतमाल साठवणुकीसाठी मिळणार मोफत मार्गदर्शन गंगाखेड, ता.१७ (बातमीदार) : शेतकऱ्यांना शेतमालाची सुरक्षित व योग्य पद्धतीने साठवणूक करता यावी. तसेच वखार व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील उपलब्ध संधींची माहिती मिळावी. या उद्देशाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वखार आपल्या दारी’ अभियानांतर्गत बुधवारी (ता. १८) एकदिवसीय मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गंगाखेड वखार केंद्र येथे आज शहरात होणारी एकदिवशीय कार्यशाळा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार असून, यामध्ये वखार व्यवस्थापन, शेतमालाची सुरक्षित साठवणूक, गोदाम व्यवस्था आणि बाजारपेठेशी जोडणी आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्रीय वखार व्यवस्थापन तज्ज्ञ प्रशांत चासकर यांच्यासह कुशाग्र मुंगी, विजय कुंभार आणि गजानन अंबेकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शेतमालाची योग्य साठवणूक न झाल्यामुळे होणारे नुकसान टाळणे, साठवणुकीच्या आधुनिक पद्धतींची माहिती घेणे आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घेणे, याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या मोफत कार्यशाळेचा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

सिडकोची घरं धोकादायक, पाच वर्षांतच इमारतींची दुरवस्था; कुठे स्लॅब कोसळतोय, तर कुठे भिंतींना तडे

SCROLL FOR NEXT