photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

रस्त्यावरच मुलांना मोफत शिक्षणाचे धडे 

अनिल जमधडे

औरंगाबाद : ‘साक्षरता अभियान’ आजच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच अजून एक सर्वांत मोठी मूलभूत बाब आहे ती म्हणजे ‘शिक्षण.’ आजच्या विज्ञान युगात जिथे आपण मोबाईल, कॉम्प्युटर, स्मार्ट फोन, वापरतोय तिथे अजूनही कित्येक लोक अशिक्षित आहेत. हे चित्र बदल्यासाठी आणि वंचित घटकातील बेघर मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी रॉबीनहूड आर्मीने रॉबीनहूड अॅकॅडमीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. रस्त्याच्या कडेने राहणाऱ्या गरजू मुलांना या माध्यमातून मोफत शिक्षण दिले आहे. तीन वर्षांत सहा हजार मुले लाभ घेत आहेत. 

केवळ परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे कित्येकजण शिक्षणपासून वंचित राहतात. अशा गरजू मुलांना रॉबीनहूड आर्मी या संघटनेतर्फे ‘रॉबीनहूड अॅकॅडमी’ असा उपक्रम सुरू केलेला आहे. ज्याअंतर्गत ज्या मुलांना अनुकूल परिस्थितीमुळे शालेय शिक्षण घेता येत नाही किंवा ज्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिलेले आहे, त्यांना या संघटनेचे सदस्य स्वतः मोफत शिक्षण देत आहेत. औरंगाबाद शहरातही हा उपक्रम डिसेंबर २०१९ पासून सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘सेठ नंदलाल धूत’ हॉस्पिटल शेजारी राहणाऱ्या मूर्तिकारांच्या मुलांना ‘रॉबीनहूड अॅकॅडमी’चे सदस्य शिकवत आहेत. याचा लाभ आतापर्यंत २० विद्यार्थी घेत आहेत. संघटनेने २०१६ पासून हा उपक्रम ७३ शहरांमध्ये सुरू केला आहे. याअंतर्गत या सर्व शहरांत सहा हजार विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. 

१,२८० मुलांना मिळवून दिला शाळेत प्रवेश 

या उपक्रमाअंतर्गत राबीनहूड अॅकॅडमीने सरकारच्या विविध योजनेअंतर्गत साधारण १,२८० गरीब मुलांना यावर्षी शाळेत विनामूल्य प्रवेश मिळवून दिला आहे. गरजू मुलांना आजच्या काळात असलेले शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन अशा मुलांना विनामूल्य शाळेत प्रवेश मिळवून शिक्षण देण्यासाठी ‘रॉबीनहूड अॅकॅडमी’चे सर्व सदस्य कार्यरत असल्याची माहिती अॅकॅडमीचे सदस्य योगेश सरोदे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT