कोठारीत १५ नोव्हेंबरला मोफत सर्वरोग निदान शिबिर
गोकुंदा : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या गौरवदिनानिमित्त कोठारी येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मातोश्री कमलाबाई डमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रविवारी (ता.१५) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा आणि स्वामी प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मुखरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा आणि आयुर्वेद अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. मोतीबिंदू, सांधेदुखी, मणक्यांचे विकार, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, पोटाचे विकार तसेच महिला व बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर निदान आणि उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गरजेनुसार सोनोग्राफी, एक्स-रे, रक्ततपासणी, ईसीजी, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या तपासण्या, आवश्यक शस्त्रक्रियांसाठी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी आधारकार्ड आणि रेशनकार्ड सोबत आणावे, असे आवाहन आयोजक विशाल स्वामी गोणेवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.