छत्रपती संभाजीनगर

घरकुल लाभार्थ्यांना मिळेना वाळू

CD
घरकुल लाभार्थींना मिळेना वाळू ----- जप्तीच्या कारवाईनंतरची स्थिती, धोरणाचा फज्जा राम काळगे ......... ​निलंगा, ता. १० : राज्य शासनाने ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय जाहीर केला असून नदीकाठावर जप्त केलेली वाळू लाभार्थींना देण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु, त्या लाभार्थींना वाळू मिळालीच नसल्यामुळे मोफत वाळू धोरणाचा फज्जा उडाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी महसूल विभागाकडून पाच ब्रास मोफत वाळू देणे नियमानुसार बंधनकारक आहे. निलंगा तहसील कार्यालयाने तालुक्यात २०२४-२०२५ या वर्षाची पंचायत समितीकडून यादी मागवली, त्यानुसार तालुक्यातील तुपडी, गिरकचाळ, सावरी, औराद शहाजानी यासह आदी गावातील जवळपास २०५ मंजूर लाभार्थींची यादी वाळूसाठी मंजूर करण्यात आली. त्यानुसार एकाही लाभार्थीला प्रत्यक्षात मोफत वाळू मिळालेली नाही. ........ तालुक्यातील जप्त वाळू निलंगा ​तालुक्यातील बामणी (२३), धानोरा (२), नदीवाडी (६), चिचोंडी (४), लिंबाळा (५), जामगा (१०), येळनुर (२), औराद शहाजानी (१), सावरी (१), शिऊर (३७), शिऊर (१७), शिऊर (१५) आणि चांदुरी या महसूल मंडळांतर्गत गावांमध्ये एकूण १,१७९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. कोकळगावातील वाटप कागदावर? तालुक्यातील कोकळगाव येथील १२ लाभार्थींना मोफत वाळूचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात असून तेथील काही लाभार्थींशी संपर्क साधला असता आम्हाला वाळू मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याबाबत माझे नाव तहसीलदारांनी काढलेल्या आदेशात आहे. परंतु, मला आजपर्यंत मोफत वाळू मिळाली नाही. मला घरकुल मंजूर आहे, वाळू मिळाली नसल्याने अडचणी येत आहेत. -धनाजी पवार, ग्रामस्थ, जामगा जप्त केलेल्या वाळूपैकी घरकुल लाभार्थींना मोफत वाळू देण्याबाबत शासनाचा आदेश आहे, त्याप्रमाणे संबंधित लाभार्थींना वाळू मिळावी यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांना आदेशित केले आहे. वाळू मिळत नसल्याचा प्रकार होत असल्यास चौकशी केली जाईल. -प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, निलंगा ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT