छत्रपती संभाजीनगर

अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांचा सन्मान

CD
ABD26J78902 गंगापूर ः अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांना ‘मैत्री जिवांचे पुरस्कार’ देऊन सन्मानित करताना गुणेशराव पारनेरकर. सोबत राजेश वाणी व दिनेश धाकड. ---- अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांचा सन्मान ---------- गंगापूर, ता. ९ (बातमीदार) : मैत्री ही केवळ एक नाते नसून दोन जिवांना जोडणारा अतूट बंध आहे, या भावनेतून सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘मैत्री जिवांचे पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत गजानन माधव पाठक व दिवंगत माधवराव व्यंकटेश वेल्हाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा रविवारी (ता. सहा) धुळे येथील हॉटेल राधाकृष्ण, रूपामाई शाळेसमोर, नकाणे रोड, देवपूर येथे पार पडला. सोहळ्यात येथील अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांना ‘मैत्री जिवांचे पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुसेवा मंडळ, पारनेरचे अध्यक्ष गुणेशराव पारनेरकर होते. तसेच ओमशांती ग्रुपचे राजेश सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सौरभ वर्तक यांनी बासरीवादन, तर पंडित रामदास पळसुले यांचे शिष्य प्रसाद वेल्हाणकर, पुणे यांनी तबल्याची साथ देत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT