छत्रपती संभाजीनगर

बीड जिल्ह्यात फळपीक विमा योजनेचा ‘आंबिया बहार’ सुरू

CD
जिल्ह्यामध्ये फळपीक विमा योजनेचा अंबिया बहार सुरू --- ​बीड, ता. ७ : हवामानाच्या अवकृपेमुळे फळबागांचे होणारे अतोनात नुकसान टाळण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा, मोसंबी, डाळिंब, संत्रा, केळी, द्राक्ष व पपई या सात मुख्य फळपिकांसाठी ही योजना लागू असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी एस.एस. साळवे यांनी केले. या योजनेसाठी जिल्ह्यात इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.ची निवड करण्यात आली आहे. योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. बिगरकर्जदार शेतकऱ्यांना बँकेत कर्जदार नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागेल, ज्या कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नाही, त्यांनी अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी बँकेला कळवणे बंधनकारक आहे; अन्यथा त्यांना आपोआप सहभागी धरले जाईल. प्रतिशेतकरी किमान २० गुंठे (०.२० हेक्टर), तर कमाल चार हेक्टर मर्यादेत विमा संरक्षण मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, ७/१२ उतारा, फळबागेचा जिओ टॅग फोटो आणि ई-पीक पाहणी असणे १०० टक्के बंधनकारक करण्यात आले आहे. यापैकी एकही बाब अपूर्ण असल्यास विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो. ----- अर्जासाठी अशी अंतिम मुदत ​द्राक्ष : १४ ऑक्टोबर २०२६ ​मोसंबी, केळी व पपई : ३१ ऑक्टोबर २०२६ ​संत्रा : ३० नोव्हेंबर २०२६ ​आंबा : ३१ डिसेंबर २०२६ ​डाळिंब : १४ जानेवारी २०२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT