Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

G20 summit Aurangabad : परिषदेसाठी रस्ते धुऊन चकाचक

महापालिकेने जी-२० परिषदेची जोरदार सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेने जी-२० परिषदेची जोरदार सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते एसटीपीच्या पाण्याने धुवून चकाचक केले जात आहेत. त्यासाठी प्रभाग कार्यालयनिहाय चार कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभाग कक्षप्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी दिली.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जी-२० परिषदेचे प्रतिनिधी शहरात येणार आहे. या प्रतिनिधींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेकडून शहरात सुशोभीकरणाची कामे केले जात आहे. रस्ते, दुभाजक, उड्डाणपुलाची कामे हाती घेण्यात आले आहे. धूळमुक्त रस्ते तयार केले जाणार आहे. पुणे शहरात ज्या पद्धतीने कामे करण्यात आली, त्या पद्धतीने शहरात स्वच्छतेची कामे सुरू आहेत. रस्त्यावर

कुठेही धुळ राहू नये याकरिता रस्ते धुवून चकाचक करण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी रस्ते धुवून स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रभाग कार्यालयातील वॉर्ड अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. रोज रात्री उशिरा एसटीपीचे पाणी टँकरने आणून रस्ते धुवून स्वच्छ केले जात आहे.

विमानतळ ते केंब्रिज शाळा, सिडको बसस्थानक, गरवारे चौक, आंबेडकर चौक, हर्सूल टी पॉइंट, हिमायत बाग, अण्णाभाऊ साठे चौक, जामा मशीद, मिलकॉर्नर, बाबा पेट्रोलपंप, लिटल फ्लावर, बीबी का मकबरा, बाबा पेट्रोलपंप ते क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हनहिल, सिडको बसस्थानक हे रस्ते पाण्याने धुवून चकाचक करण्यात येत असल्याचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: सोलापूरच्या राजकारणात भूकंप, ३ दिग्गजांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Samruddhi Expressway fire incident : समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टर बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT