(((१६ तारखेच्या बातमीतील लोगो घ्यावे)))
--
भक्ती गणेश मंदिरात आज अथर्वशीर्ष पठण
--
‘तनिष्का’, ‘विहिंप’ आणि मंदिर अर्चक पुरोहित आयामाचा उपक्रम
---
सिडको, ता. २० : श्री गणेशाच्या मंगलमय आगमनानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ही भक्ती अधिक वृद्धिंगत व्हावी आणि गणेशभक्तांना सामूहिक उपासनेची संधी मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ, विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि मंदिर अर्चक पुरोहित आयाम, एन-१ येथील भक्ती गणेश ट्रस्ट आणि श्री गणेश सभेच्या वतीने सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता भक्ती गणेश सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे.
श्री गणेशाच्या आगमनाचा उत्सव केवळ उत्साहानेच नव्हे, तर भक्ती आणि संस्कारमय वातावरणात साजरा व्हावा, या हेतूने हा उपक्रम होत आहे. सामूहिक अथर्वशीर्ष पठणामुळे गणेशभक्तांना एकत्रितपणे श्री गणेशाची आराधना करण्याची आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
---
भक्तीचा सामूहिक जागर
अथर्वशीर्ष पठणाला गणेश उपासनेत विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महिला, कुटुंबे, युवक आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामूहिक पठणात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले. सामूहिक पठणाच्या माध्यमातून भक्ती, एकात्मता आणि सामाजिक सहभागाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी श्रुती काटे (९१३०६३२२२१) यांच्याशी संपर्क साधावा.
---
पुढील उपक्रम कधी, कुठे? (वेळ : सकाळी ८ वाजता)
मंगळवार (ता. २२ सप्टेंबर) : वरद गणेश मंदिर, समर्थनगर
गुरुवार (ता. २४ सप्टेंबर) : गणपती मंदिर, पन्नालालनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.