छत्रपती संभाजीनगर

बाजारपेठ गजबजली , गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीला उधाण;

CD
पान १ मेन (दोन कॉलम) -- गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीला उधाण; गणेशभक्तांची तुडुंब गर्दी --- लातूर, ता. १३ ः लाडक्या गणरायाचे आगमन थाटामाटात व्हावे, यासाठी शहरातील बाजारपेठेत गणेशभक्तांची तुडुंब गर्दी झाली आहे. विविध आकारातील गणेशमूर्तीपासून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आकर्षक मखर, पूजेचे साहित्य, फुले, तोरण आणि अन्य सजावटींच्या वस्तूंची खरेदी करण्यात लातूरकर रमले आहेत. सध्या दुष्काळसदृश स्थिती असली, तरी गणरायाच्या आगमनानिमित्ताने उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण बाजारात पाहायला मिळत आहे. दरवर्षी श्री गणेश चतुर्थी अतिशय भक्तिभावाने साजरी केली जाते. यंदाच्या उत्सवावर दुष्काळाचे सावट असले तरी घरातील आबालवृद्धांचे या सणाकडे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे घराघरांत गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मंडळांकडून कमानी उभारणे, मांडव उभारणे, देखाव्यांची तयारी करणे, गणरायांच्या आगमनासाठी रथ सजविणे अशी विविध कामे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. घरगुती गणेशोत्सवाचीही जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून आले. मखर, विद्युत रोषणाईच्या व फुला-पानांच्या माळा, आसन, रांगोळी, फळे, मोदक, मक्याचे कणीस, गुलाल, नारळ, कापूर, उदबत्ती, धूप, कापूर अशा वस्तू घेण्यात लातूरकर रमले होते. विलासराव देशमुख मार्ग येथे महापालिकेने मूर्तिकारांसाठी आणि विक्रेत्यांसाठी १०० हून अधिक दालने उभी केली आहे. येथे गणेशमूर्तीच्या बुकिंगसाठी आणि खरेदीसाठी रविवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. --- चौकट पावसाअभावी फुलांची आवक घटली गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, राजीव गांधी चौक, दयानंद गेट येथे मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होते. यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी, विक्रेते येतात. पण, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झेंडूची आवक कमी झाली होती. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे बाजारात फुलांचे प्रमाण कमी दिसत आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झेंडूचे भाव १०० ते १६० रुपये किलो होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT