छत्रपती संभाजीनगर

गणेशोत्सवासाठी मोदक, पेढ्यांची जोरदार तयारी

CD
गणरायाच्या नैवेद्याला मोदक-पेढ्यांची मेजवानी! विविध प्रकारच्या मिठायांनी सजली दुकाने; गावरान तुपातील मोतीचूर लाडू ८०० रुपये किलो मनेष शेळके छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : गणेशोत्सवामुळे शहरातील बाजारपेठ सजली असून, विविध प्रकारचे साहित्य दाखल झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. गणरायाला नैवेद्य दाखविण्यासाठी मोदक आणि पेढ्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे शहरातील मिठाई विक्रेत्यांनी विविध प्रकारचे मोदक आणि पेढे तयार करण्यास सुरवात केली आहे. प्रसादासाठी केशर, मलाई, चॉकलेट, खोबऱ्याचे तसेच उकडीचे मोदक तयार केले जात आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे मोदक बनवून दिले जात आहेत. यासोबतच मोतीचूर लाडू, बेसन लाडू यांसह विविध प्रकारची मिठाई उपलब्ध केली जात आहे. मोतीचूर लाडूचा दर साधारणतः ३०० ते ३२० रुपये किलो असून, गावरान तुपातील मोतीचूर लाडूचा दर सुमारे ८०० रुपये किलो आहे. गणेशोत्सवात दररोजच्या प्रसादासाठी पेढ्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे दूध पेढा, कंदी पेढा, पिस्ता पेढा, मथुरा पेढा, साधा पेढा आणि चॉकलेट पेढ्यांना मागणी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांनी दुकानांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेत तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, साडेतीनशे ते ६८० रुपयांपर्यंत मोदकाचे दर आहेत. ....... कोट आमच्या दुकानात दर्जेदार मिठाई तयार करून विक्री केली जाते. कोणत्याही पदार्थात भेसळ केली जात नाही. ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. शहरात गेल्या १५ वर्षांपासून आमचे दुकान सुरू आहे. - रामकिशोर जाट, सेल्समन, न्यू सरोज बिकानेर मिठाईवाला ........... सध्या उकडीच्या मोदकासाठी लागणारा मसाला तयार करण्याचे काम सुरू आहे. सर्व पदार्थ शक्यतो घरगुती पद्धतीने तयार केले जातात. बाहेरून पदार्थ आणले जात नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतली जाते. - रेवत चौधरी, माँ भवानी बिकानेर स्वीट्स ............... असे आहेत पेढ्यांचे दर दूध पेढा — ६०० रुपये किलो कंदी पेढा — ५६० रुपये किलो पिस्ता पेढा — ५२० रुपये किलो मथुरा पेढा — ४८० रुपये किलो साधा पेढा — ४०० रुपये किलो चॉकलेटी पेढा — ३६० रुपये किलो

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

SCROLL FOR NEXT