((अँकर))
................
‘धाराशिवच्या महाराजा’ची गवळी गल्लीत प्रतिष्ठापना
भव्य लेझीम पथक अन् भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १५ ः गवळी गल्लीतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री बाल हनुमान गणेश मंडळा’च्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात झाली.
सन १९६४ पासून चालत आलेल्या परंपरेनुसार, मूर्तिकार अमर भांगे यांच्याकडून गरुडासनस्थ पालखीतून मूर्ती मिरवणुकीने आणण्यात आली. पांढरा कुर्ता-पायजमा आणि भगव्या टोप्या परिधान केलेल्या दीडशे खेळाडूंच्या लेझीम पथकाने सलग चार तास सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ, ढोल-ताशा आणि शंखाच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सामाजिक बांधिलकीचा इतिहास
मंडळाचे हे ६२ वे वर्ष असून, यंदा १२० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून प्रा.डॉ. इंगळे व डॉ. क्षीरसागर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने ५२ वर्षांपासून चपने परिवाराच्या हस्ते पूजाविधी पार पाडला जातो.
मंडळाचे शिल्पकार काशिनाथ दिवटे यांनी टाकाऊ वस्तूंपासून ''लंका दहन'' हा पर्यावरणपूरक हलता देखावा कोणताही मोबदला न घेता तयार केला आहे. याशिवाय, मंडळात दररोज विविध धर्मीय ग्रंथ व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून सर्वधर्मसमभाव जपला जातो. यंदाच्या मिरवणुकीत व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण आणि प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भालचंद्र हुच्चे व प्रा. गजानन गवळी यांनी केले. मनमत पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्रींची प्रतिष्ठापना झाली.
........
धाराशिव ः गवळी गल्लीतील ''श्री बाल हनुमान गणेश मंडळा''च्या गणेशमूर्तीचे लेझीम पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. (दुसऱ्या छायाचित्रात) मंडळाची विलोभनीय मूर्ती.
....
फोटो क्रमांक ः OSM26B06999, OSM26B07000
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.